जळगावातील खंडेराव नगरात दोन गटात दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:40 IST2018-06-02T22:40:34+5:302018-06-02T22:40:34+5:30
खंडेराव नगरात शुक्रवारी रात्री दहा वाजता लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन वाद झाला़ यामुळे दोन गट समोरासमोर आल्याने जमावाकडून दगडफेक झाली.

जळगावातील खंडेराव नगरात दोन गटात दगडफेक
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२ - खंडेराव नगरात शुक्रवारी रात्री दहा वाजता लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन वाद झाला़ यामुळे दोन गट समोरासमोर आल्याने जमावाकडून दगडफेक झाली. यात दोन्ही गटातील सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. दोघांनी एकमेकांविरुध्द रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे़
या घटनेत दगडांशिवाय लाकडी दांडे व लाठ्याकाठ्यांचा वापर झाल्याचे दोन्ही गटाचे म्हणणे आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी रिक्षा चालक शेख मेहमूद शेख हुसेन पिंजारी (वय ६० ) यांनी दिलेल्या तक्रारीत बाशिद रमजान पिंजारी, हसन रमजान पिंजारी व त्यांच्या दोन मुलांनी किरकोळ कारणावरुन वाद घालून मारहाण केली असे म्हटले आहे तर जावेद पिंजारी वय १७ रा़ खंडेराव नगर याच्या तक्रारीत महेमूद पिंजारी, मुश्ताक पिंजारी, साहिल फारुख पिंजारी व खलिद पिंजारी यांनी लहान मुलांच्या भांडणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली़ तसेच लाठ्याकाठ्या व दगडांचा मारा केल्याचे म्हटले आहे.