जळगावनजीक पोलीस वाहनावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:51 IST2020-04-04T13:50:58+5:302020-04-04T13:51:40+5:30
गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार

जळगावनजीक पोलीस वाहनावर दगडफेक
जळगाव : डांभुर्णी (ता.यावल) येथील १६ वर्षीय मुलाच्या खून प्रकरणातील संशयितास पोलीस जळगावला घेऊन जात असताना, त्याच गावातील काही तरूणांनी ममुराबाद येथे बसस्थानकावर पोलिसांचे वाहन अडविले. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. संतप्त तरुणांनी विटा व दगडांचा मारा सुरू केल्याने पोलीस जीव वाचविण्यासाठी वाहनात बसून जळगावच्या दिशेने रवाना झाले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली.