शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकावर पुन्हा दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:05 IST

बळीराम पेठेतील घटना : एकावर गुन्हा दाखल, २२ विक्रेत्यांचा माल जप्त, दगडफेकप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून शुक्रवारी सकाळी ११ वाजता बळीरामपेठेत कारवाई सुरु असताना, काही विक्रेत्यांनी मनपाच्या पथकावर दगडफेक केली. सुदैवाने या दगडफेकीत मनपाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. गेल्या महिन्यातदेखील मनपाच्या पथकावर जोशीपेठेत मोठ्या जमावाने दगडफेक केली होती. शुक्रवारी झालेल्या दगडफेकप्रकरणी एका भाजीपाला विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनपाकडून दररोज अनधिकृत हॉकर्स व अतिक्रमणधारकांवर कारवाईची मोहीम सुरु आहे. मात्र, एकीकडे कारवाई सुुरु असताना दुसरीकडे हॉकर्सदेखील शिरजोर होत जात आहे.शुक्रवारी मनपाचे पथक बळीरामपेठ भागात कारवाईला पोहचल्यानंतर अनेक विक्रेत्यांनी धावपळ न करता व्यवसाय सुरुच ठेवला. त्यानंतर मनपाकडून कारवाईला सुरुवात झाल्यानंतर काही विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत कारवाईला विरोध केला. त्यातच गुरुवारच्या कारवाईत हातगाडी जप्त करण्यात आलेल्या काही विक्रेत्यांनीही या वादात सहभाग घेत मनपा कर्मचाºयांशी हुज्जत घातली. त्यातच परशुराम गवळी नामक विक्रेत्याने मनपा कर्मचाºयांवर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली.अचानक सुरु झालेल्या दगडफेकीमुळे मनपा कर्मचाºयांनी संरक्षणासाठी पळापळ केली. काही वेळाने हा वाद आटोक्यात आला. त्यानंतर मनपाच्या पथकाने २२ विक्रेत्यांवर कारवाई करत हातगाड्या व माल जप्त केला.दरम्यान, दगडफेकप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव