मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम १६ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:23+5:302021-07-30T04:18:23+5:30
गजानन चौधरी सेवानिवृत्त (फोटो मेल केला आहे) जळगाव : मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम पाहत ...

मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम १६ पासून
गजानन चौधरी सेवानिवृत्त (फोटो मेल केला आहे)
जळगाव : मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम पाहत असलेले गजानन चौधरी हे ३१ जुलै रोजी आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. चौधरी यांनी मनपातील अभिलेखागार, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, क्रीडा व दवाखाने विभागात काम केले.
शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलालगत विद्युत खांब स्थलांतराचे काम रखडल्याने पुलाचे काम थांबले आहे. जरी मनपाने यासाठीची दीड कोटी रुपयांची रक्कम देण्याची तयारी केली असली तरी महावितरणकडून कामाला उशीर होऊ शकतो. म्हणून मनपा व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामाला लवकर सुरुवात करण्याचा सूचना द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.