भुसावळ येथे रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:45 IST2018-11-11T23:44:42+5:302018-11-11T23:45:42+5:30

रेल्वेचे तिकीट निरीक्षक राजेंद्र शंकर देशपांडे (रा. सिद्धिविनायक कॉलनी, गजानननगर) यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केली. सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

Stealing the railway staff house at Bhusawal | भुसावळ येथे रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

भुसावळ येथे रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

ठळक मुद्दे७० हजार रुपयांचा ऐवज लंपासकुटुंबीय घरी नसताना चोरट्यांनी साधला डावरोख रकमेसोबतच ४५ हजारांचे दागिने होते

भुसावळ : येथील रेल्वेचे तिकीट निरीक्षक राजेंद्र शंकर देशपांडे (रा. सिद्धिविनायक कॉलनी, गजानननगर) यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केली. सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. देशपांडे घरी नसताना चोरट्यांनी ही संधी साधली. देशपांडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिकीट निरीक्षक देशपांडे हे रविवारी दुपारी दीड वाजता घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी ही माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली. २५ हजार रुपये रोख व ४५ हजार रुपयांचे दागिने लंपास झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.




 

Web Title: Stealing the railway staff house at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.