रावेर : ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशा मागणीचे निवेदन भाजपतर्फे तहसीलदार कार्यालयामार्फत राज्यपालांकडे सादर करण्यात आले.
भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, पंचायत समिती सभापती कविता कोळी, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, पंचायत समिती सदस्य पी. के. महाजन, जितेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजप तालुका सरचिटणीस प्रा. सी. एस. पाटील व महेश चौधरी, हरलाल कोळी, शुभम पाटील, भाजप ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अतुल महाजन, हिलाल सोनवणे, प्रा. संजय मोरे आदी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत तहसील कार्यालयात धडक दिली.
निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार यांनी भाजपतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावे सादर केलेले निवेदन स्वीकारले.