जय मातृभूमी पक्षातर्फे समस्यांबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:04+5:302021-09-06T04:21:04+5:30
भुसावळ : येथील जय मातृभूमी पक्षातर्फे शहरातील विविध समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात जिल्हाध्यक्षा ॲड. कृष्णासिंग ठाकूर ...

जय मातृभूमी पक्षातर्फे समस्यांबाबत निवेदन
भुसावळ : येथील जय मातृभूमी पक्षातर्फे शहरातील विविध समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात जिल्हाध्यक्षा ॲड. कृष्णासिंग ठाकूर यांनी म्हटले आहे की, शहरामध्ये मागील पाच वर्षांपासून गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने गटारी तुडुंब भरून वाहत आहेत.
याचे घाण पाणी रस्त्यावर पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसंत टॉकीजपासून ते जामनेर रोडपर्यंत रस्त्यांची चाळण झाली असून, खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच अनेक कॉलन्यांमध्ये पथदिवे, सार्वजनिक शौचालये उभारण्याची गरज असून याबाबत तातडीने उपायोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी ॲड. विजय लक्ष्मी मुत्याल, ॲड. मनीषकुमार वर्मा, ॲड. योगेश दलाल, ॲड. सचिन कोष्टी, ॲड. दुर्गेश लहासे, ॲड. जगदीश भालेराव, रवींद्र लेकुरवाडे, अशोक मेढे, ॲड. भूपेश बाविस्कर, आदी उपस्थित होते.