आदिवासी भिल्ल समाज संघटनेच्या वतीने निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:35+5:302021-07-11T04:12:35+5:30
कजगाव, ता. भडगाव : जिल्ह्यात विविध तालुक्यांत भडगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव व अन्य तालुक्यांतील आदिवासी भिल्ल समाजाची दफनभूमी ...

आदिवासी भिल्ल समाज संघटनेच्या वतीने निवेदन
कजगाव, ता. भडगाव : जिल्ह्यात विविध तालुक्यांत भडगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव व अन्य तालुक्यांतील आदिवासी भिल्ल समाजाची दफनभूमी सातबारा उताऱ्यावर लावून देण्यात यावी व सन २०२१च्या जनगणना सर्वेमध्ये जात प्रमाणपत्रात हिंदू भिल्लऐवजी आदिवासी भिल्ल अशी नोंद होण्याकरिता आदिवासी भिल्ल समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच दि. १९ जुलै रोजी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दफनभूमी महामोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेच्या संस्थापिका सुमित्रा पवार व महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ॲड. सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, संपर्कप्रमुख देवीदास बहिरम, भडगाव तालुकाध्यक्ष अक्षय मालचे, चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष प्रवीण मोरे, पारोळा तालुकाध्यक्ष बाळू मालचे, अप्पासाहेब मोरे, किशोर ठाकरे, राजेश मालचे, मोतीलाल सोनवणे, मंगेश मोरे आदी उपस्थित होते.
100721\10jal_5_10072021_12.jpg
संघटनेच्या वतीने निवेदन देताना संघटनेचे कार्यकर्ते.