जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:17 IST2019-08-28T23:16:33+5:302019-08-28T23:17:23+5:30

जळगाव - जिल्ह्यातील तीन शिक्षकांना 'राज्य आदर्श शिक्षक' पुरस्कार जाहीर झाला आहे. यात प्राथमिक गटात शिंदी (ता. चाळीसगाव) जि़प़ ...

State Teachers Award has been announced for the three teachers in the district | जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील तीन शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जळगाव- जिल्ह्यातील तीन शिक्षकांना 'राज्य आदर्श शिक्षक' पुरस्कार जाहीर झाला आहे. यात प्राथमिक गटात शिंदी (ता. चाळीसगाव) जि़प़ शाळेचे शिक्षक लक्ष्मण धाकलू चव्हाण, माध्यमिक गटात तांदुळवाडी (ता. भडगाव) येथील कै़ यादव दगडू पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र दयाराम निकम यांना तसेच आदिवासी प्राथमिक गटात मोरव्हाल (ता. रावेर) जि़प़ मुलांच्या शाळेचे शिक्षक मुबारकशाह सिकंदरशाह फकीर यांचा समावेश आहे.
या शिक्षकांना प्रत्येकी १० हजार रुपये पुरस्कारादाखल देण्यात येतील. पुरस्कार वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात होईल.
या पुरस्कारासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते़ अर्ज भरलेल्या शिक्षकांना नाशिक येथे बोलविण्यात आले व त्यातील काही शिक्षकांची निवड करून पुणे येथे मुलाखतीसाठी पाठविण्यात आले होते़ त्यातून ही निवड करण्यात आली.

Web Title: State Teachers Award has been announced for the three teachers in the district