शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

धरणगावला स्टेट बँकेचे सेवाकेंद्र फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 6:49 PM

महिलेची मंगलपोत लांबविण्याचा प्रयत्न फसला

धरणगाव : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून शनिवारी रात्री येथील बालाजी काँम्प्युटरचे स्टेट बँक सेवाकेंद्र्र फोडून तेथील पाच हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य चोरट्यांंनी लांबविले. या सोबतच पतीसोबत रात्री फिरायला निघालेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळ्याची मंगलपोत लांबविण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.नगरपालिकेला लागूनच असलेल्या व्यापारी संकुलातील गाळा क्र.१ मध्ये असलेल्या एसबीआय सेवा केंद्र व सायबर कॅफेचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ३ सी.सी.टी.व्ही कॅमेरे, १ डीव्हीआर मशिन, १ हार्ड डिस्क, १ मॉनिटर सह पाच हजाराची रोकड लंपास केल्याची फिर्याद स्वप्नील भाटिया व शार्दूल भाटिया यांनी दिली आहे.दुसऱ्या एका घटनेत जैन गल्लीतील रहिवासी व पी. आर.हायस्कूलमधील शिक्षिका वंदना डहाळे व त्यांचे पती राजेश डहाळे रात्री साडेदहाच्या सुमारास फिरून घरी परत येत होते. परिहार चौकाच्या अहिल्यादेवी होळकर चौकात मोटारसायकलवर दोन जण भरधाव वेगात आले व चालत्या गाडीवरून वंदना डहाळे यांच्या गळ्यातील मंगलपोत ओढूली. त्या वेळी डहाळे यांनी गळ्यातील पोत घट्ट पकडून ठेवली व आरडाओरड केली. सोबत असलेले पती राजेश डहाळे यांचा हा प्रकार लक्षात येईपर्यंत चोरटे भरधाव निघून गेले. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. त्यावरून चोरट्यांची हिम्मत दिसून येते.दर गुरुवारी आठवडे बाजारात सात ते आठ मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना घडत आहे. मात्र या हरविलेल्या मोबाईलचा तपास लागत नाही. प्रत्येक बाजाराच्या दिवशी महिला चोरांची टोळी मोबाईल चोरी करीत असल्याची चर्चा आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनांबाबत पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव