चिन्याच्या मृत्यू प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 20:53 IST2020-11-25T20:53:40+5:302020-11-25T20:53:50+5:30
जळगाव : कारागृहातील बंदी रवींद्र उर्फ चिन्या जगताप याच्या मृत्युप्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. त्याबाबत अपर ...

चिन्याच्या मृत्यू प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न
जळगाव : कारागृहातील बंदी रवींद्र उर्फ चिन्या जगताप याच्या मृत्युप्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. त्याबाबत अपर पोलीस महासंचालक (कारागृह) यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती व सद्यस्थितीबाबतचा अहवाल मागितला होता. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी वरिष्ठांना त्याबाबत माहिती पाठविली आहे. हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न क्रमांक १५५५४ द्वारे रविंद्र जगताप मृत्यू प्रकरणाचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचा संदर्भ देत गृह विभागाच्या कार्यासन अधिकारी राखी चव्हाण यांनी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) यांना १९ नोव्हेंबर रोजी पत्र दिले होते.