टेक्नो व्हिजन स्पर्धेत एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:00 IST2019-11-07T20:59:48+5:302019-11-07T21:00:19+5:30

जळगाव - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कालाहांडी ओडीसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेक्नो-व्हिजन २ के १९ ...

 SSBT Student Success in Techno Vision Competition | टेक्नो व्हिजन स्पर्धेत एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांचे यश

टेक्नो व्हिजन स्पर्धेत एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कालाहांडी ओडीसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेक्नो-व्हिजन २ के १९ या स्पर्धेत एसएसबीटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे़
टेकनिकल पेपर सादरीकरण गट ३ मध्ये एसएसबीटीच्या मेकॅनिकल विभागातील मनूप्रतापसिंग परमार याने इम्प्रोव्हमेंट आॅफ आॅफ फ्युएल इफिसिएंसी इन आॅटोमोबाईल या विषयावर प्रेसेंटेशन देऊन प्रथम पारितोषिक व प्रशस्तीपत्र पटकावले. तसेच गट १ मध्ये प्रतिमा नाईक व प्रियदर्शनी पाटील यांनी पी़सी़ बेस्ड आॅरडिनो रोबोट या विषयावर प्रेसेंटेशन देऊन तृतीय पारितोषिक पटकाविले़ या विद्यार्थ्यांना प्राक़ृष्णा श्रीवास्तव व प्रा़ एम़व्ही़ कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले़ या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ़ के़एस़वाणी, उपप्राचार्य डॉ़ एस़पी़शेखावत व यांत्रिक विभाग प्रमुख नवनीत पाटील यांनी गौरव केला़

Web Title:  SSBT Student Success in Techno Vision Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.