कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:06 IST2019-11-23T23:03:28+5:302019-11-23T23:06:23+5:30
तालुक्यातील आव्हाणे येथे आसमाबी करीम शेख (२७) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. पतीसह सासरच्यांकडून तिचा छळ सुरु होता. त्याला कंटाळून आसमाबी हिने आत्महत्या केल्याचा आरोप भाऊ अल्ताफ अफजल खा (रा.हुडको, पिंप्राळा) यांनी केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या
जळगाव- तालुक्यातील आव्हाणे येथे आसमाबी करीम शेख (२७) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. पतीसह सासरच्यांकडून तिचा छळ सुरु होता. त्याला कंटाळून आसमाबी हिने आत्महत्या केल्याचा आरोप भाऊ अल्ताफ अफजल खा (रा.हुडको, पिंप्राळा) यांनी केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील पिंप्राळा हुडको येथील माहेर असलेल्या आसमाबी हीचा विवाह आव्हाणेतील ट्रकचालक करीम शेख याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांपासून पती करीम शेख यांच्यासह सासरच्या लोकांकडून छळ सुरु होता. शुक्रवारी रात्रीही तिने वाद झाल्याबाबत भावाला फोन केला होता. सासरच्या छळास कंटाळून शनिवारी आसमाबी यांनी घराच्या दुसºया मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना समोर येताच माहेरच्या लोकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठून आक्रोश केला. सायंकाळी उशीरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आसमाबी हिस तीन मुले व दोन मुली आहेत. चार महिन्यांच्या दोघा मुलींचे मातृछत्र हरपले आहे.