शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकेची सोनपोत लांबविली

By admin | Updated: March 24, 2017 00:34 IST

बसमध्ये चढताना प्रकार : चौकशीसाठी बस पोलीस ठाण्यात

जळगाव : नवीन बसस्थानकात जळगाव-कुरंगी बसमध्ये चढताना फेसर्डी ता. पाचोरा येथील अंगणवाडी सेविका महिलेची सोनसाखळी लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी १़१५ वाजेच्या सुमारास घडली़ यादरम्यान प्रकार वेळीच लक्षात आल्याने आठ ग्रॅम पैकी चार ग्रॅमचे मणी महिलेच्या हाती लागले़ चालक व वाहनाने थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बस नेली़ प्रवाशांच्या चौकशीनंतर बस परत मार्गस्थ झाली़अलका पाटील  खाजगी कामासाठी २४ रोजी जळगावला आल्या होत्या़ २५ पासून वावदडा येथे प्रशिक्षण असल्याने त्या घरी न जाता थेट वावदडा येथे जाणार होत्या़ त्या  जळगाव-कुरंगी बसमध्ये चढताना  गर्दीचा फायदा घेत चोरट्याने अलका पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली़ प्रकार लक्षात आल्याने सोनसाखळीतील काही मणी हाती लागले़ आठ ग्रॅमच्या सोनसाखळीपैकी साडेतीन ग्रॅमचे मणी व मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याचे अलका पाटील यांनी सांगितले़जळगाव-कुरंगी (क्ऱ एम एच ४०, एन ९१०५) बसमध्ये मानसिंग बिसन परदेशी हे चालक तर रघुनाथ नामदेव तायडे हे वाहक होते़ घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे एएसआय शिवाजी वराडे, हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाठक, सिद्देश डाबकर यांनी बसस्थानक गाठले़ प्रवाशांपैकी कुणी संशयित असावा, या चौकशीसाठी बस थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आली़ तेथे पाटील यांचा जबाब नोंदविला़ अल्पवयीन मुलीला पळविणाºयाविरूध्द बलात्काराचा गुन्हाएका तरूणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुरूवारी या घटनेत पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानेवैद्यकीय तपासणीनंतर तरूणाविरोधात बलात्कार तसेच बाल लैंगिंग अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आले असून संबंधित तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे़ रामेश्वर कॉलनी परिसरातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवित १६ रोजी पळवून नेले होते़ आठवडाभरानंतर बुधवारी रात्री दोघे सुरत येथून रेल्वेने जळगावला परतले़ मुलगी घरी गेल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशन गाठले़ पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले़ त्यानुसार तरूणाविरोधात वाढीव कलम लावले आहे़ मुलीला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे़