सोमनाथ गोहीलांनी स्वीकारला अतिरिक्त वित्त व लेखा अधिकारी पदाचा कार्यभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 20:50 IST2020-12-04T20:50:38+5:302020-12-04T20:50:49+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपवित्त व लेखा अधिकारी ...

सोमनाथ गोहीलांनी स्वीकारला अतिरिक्त वित्त व लेखा अधिकारी पदाचा कार्यभार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपवित्त व लेखा अधिकारी एस.आर. गोहिल यांनी शुक्रवारी स्वीकारला.
विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारातून कार्यमुक्त करणे बाबत डॉ.विवेक काटदरे यांनी कुलगुरुंकडे विनंती केली होती. ती मान्य करण्यात येऊन उप वित्त व लेखा अधिकारी एस.आर. गोहिल यांच्याकडे ४ डिसेंबर पासून वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. श्री.गोहिल यांनी डॉ.विवेक काटदरे यांच्याकडून वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आज स्वीकारला. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, आणि अधिकारी उपस्थित होते.