काँग्रेसमधूनही काही आमदार सरकारमध्ये सहभागी होणार; मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा
By विलास.बारी | Updated: July 8, 2023 19:43 IST2023-07-08T19:42:44+5:302023-07-08T19:43:08+5:30
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता काँग्रेसची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसमधूनही काही आमदार सरकारमध्ये सहभागी होणार; मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा
जळगाव : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या सरकारमध्ये येतील असे कुणाला वाटले नव्हते. मात्र, शुक्रवारी त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. आम्ही केलेला उठाव योग्यच होता. उगागच आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अनेकजण ‘मातोश्री’बाहेर पडताहेत. याचाच अर्थ ‘दालमें कुछ काला है’. काँग्रेसमधूनही काही आमदार सरकारमध्ये येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे भाष्य केले.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रवेशाविषयी विचारल्यावर मंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. ज्या गोष्टी लोकांच्या डोक्यात नाही, त्या गोष्टी राज्यात घडताहेत. मीही ऐकलंय की काँग्रेसमधूनही काहीजण दाखल होणार आहेत. अजित पवार सरकारमध्ये येतील, याविषयी मी दोन महिन्यांपूर्वीच कल्पना दिली होती.
राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांच्याविषयीही मी बोललो होतो. ते भाजपत येतील म्हणून आता काँग्रेसमधूनही काही आमदार येतील, असा दावाही त्यांनी केला.