आध्यात्मिक मार्गाने उपाय शोधता येतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:05 IST2019-08-31T16:04:48+5:302019-08-31T16:05:56+5:30

प्रत्येकाच्या जीवनात अनेक समस्या आहेत. वैयक्तिक समस्यांपासून सुरुवात होऊन ती जेव्हा सामाजिक समस्या बनते तेव्हा आपण तिचा विचार करतो पण तिच्या मुळाशी जात नाही. त्यामुळे आपणास त्यावर उपाय सापडत नाही. अध्यात्मिक मार्गाने त्यावर उपाय शोधता येतो

The solution can be found in a spiritual way | आध्यात्मिक मार्गाने उपाय शोधता येतो

आध्यात्मिक मार्गाने उपाय शोधता येतो

ठळक मुद्देमहंत गोपालदास पंजाबी यांचे प्रतिपादनभडगाव येथे केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमाला

भडगाव, जि.जळगाव : प्रत्येकाच्या जीवनात अनेक समस्या आहेत. वैयक्तिक समस्यांपासून सुरुवात होऊन ती जेव्हा सामाजिक समस्या बनते तेव्हा आपण तिचा विचार करतो पण तिच्या मुळाशी जात नाही. त्यामुळे आपणास त्यावर उपाय सापडत नाही. अध्यात्मिक मार्गाने त्यावर उपाय शोधता येतो पण त्यासाठी अध्यात्म म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे, असे विचार येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनीद्वारे आयोजित रौप्य महोत्सवी मासिक व्याख्यानमालेत महानुभाव पंथाचे महंत गोपालदास पंजाबी यांनी व्यक्त केले.
व्यासपीठावर निवृत्त शिक्षक बाविस्कर, अशोक पंजाबी, प्रा.पी.डी.पाटील, प्रा.विठ्ठल बागुल होते. सर्व धर्माचा आधार एकच असून आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले व अहंकार सोडला तर समस्या शिल्लकच राहणार नाही.
याप्रसंगी त्यांनी प्रदूषण, सार्वजनिक उत्सव, हुंडा, धार्मिक तेढ इत्यादी समस्यांवर सखोल चर्चा केली. ऐतिहासिक उदाहरणे देऊन त्यांनी तरुण पिढीला सुसंकारित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन प्रा.पुजारी यांनी, तर प्रास्ताविक विजय देशपांडे यांनी केले. सदर व्याख्यान हे प्रा.बागुल यांनी आपल्या मातोश्री तपस्वी दुर्गाबाई बिडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले होते.

Web Title: The solution can be found in a spiritual way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.