नागरिकत्व विधेयकाविरोधात भुसावळ येथे समाज एकवटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 20:10 IST2019-12-16T20:07:36+5:302019-12-16T20:10:17+5:30
नागरिकत्व विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुस्लीम मंचतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.

नागरिकत्व विधेयकाविरोधात भुसावळ येथे समाज एकवटला
भुसावळ, जि.जळगाव : बहुचर्चित नागरिकत्व कायद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने मुस्लीम धर्मियांवर अन्याय झाला आहे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुस्लीम मंचतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार दिलीप बारी यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवेदनावर अॅड.वसीमखान, हाजी सलीम पिंजारी, हाजी आशिकखान शेरखान, माजी उपनगराध्यक्ष हाजी शफी शेख अजीज, माजी नगरसेवक साबीर मेंबर, मौलाना अब्दुल हकीमखान, मौलाना कमरूद्दीन, हाफीज गुलाम सरवर, हाफीज नूर आलम, हाफीज अखलाक, हाफीज गुलाम जिलानी, हाफीज सुल्तान रजा, कब्रस्थान कमेटी अध्यक्ष युसूफखान मोहम्मदखान, बागवान युवा फाऊंडेशन अध्यक्ष साजीद सलीम बागवान, डॉ.इम्रान रऊफखान, इम्तियाज अहेमद, मो.मुन्वरखान, महेबूबखान, सिकंदरखान, रहिम मुसा कुरेशी, राजू चौधरी, सलीम गवळी, अकील शाह यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षºया आहेत.