शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या घराचे बांधकाम पाडताना स्लॅब कोसळून मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:00 IST

केर्‍हाळे बुद्रूक येथील घटना, तडवी कुटुंबावर शोककळा


रावेर : तालुक्यातील केर्‍हाळे बुद्रूक  येथील एका घराच्या नवीन बांधकामासाठी जुने स्लॅबचे घर मजुरीने पाडत असताना काँक्रिट स्लॅब अंगावर कोसळून पडल्याने फिरोज रुबाब तडवी (३८, रा. केर्‍हाळे खुर्द, ता. रावेर) हा गंभीर जखमी झाला. त्यास गंभीर अवस्थेत रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
      रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, केर्‍हाळे बुद्रूक येथील वैभव वासुदेव महाजन यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी जुने घर पाडण्यासाठी मजूरीने गेलेला मजूर फिरोज रुबाब तडवी (वय ३८) याच्या डोक्यावर काँक्रिट स्लॅब कोसला. ही घटना  ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.    दरम्यान, त्यास  रावेर ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलवले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी  तो मृत असल्याचे घोषित केले. 
  रावेर पोलिसांत याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महाजन यांनी शवविच्छेदन केले. केर्‍हाळे खुर्द येथील दफनभूमीत त्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.   रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. नीलेश चौधरी पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान तडवी कुुटुृंबाला मदत मिळावी अशी  मागणी होत आहे.