सहा वर्षीय बालकाचा यावल येथे खून; पोलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 18:47 IST2025-09-06T18:47:19+5:302025-09-06T18:47:29+5:30
याबाबत गुन्हा दाखल करण्याचे यावल पोलिसात सुरु आहे.

सहा वर्षीय बालकाचा यावल येथे खून; पोलिसांत गुन्हा
सुधीर चौधरी, यावल (जळगाव) : येथील बाबुजीपुरा परिसरात सहा वर्षीय बालकाचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
मोहम्मद हन्नान खान माजिद खान (वय ६) असे या बालकाचे नाव आहे. ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह ६ सप्टेंबर रोजी सकाळी शेजारील घरातील वरच्या मजल्यावर आढळून आला.
मुलाचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने संशयिताच्या दुकानावर दगडफेक केली. यामुळे शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे यावल पोलिसात सुरु आहे.