जामनेर तालुक्यातील कापूसवाडीच्या ६ जणांना १० वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:23 IST2018-10-15T22:22:18+5:302018-10-15T22:23:44+5:30
मारहाण करणाऱ्या सहा जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़

जामनेर तालुक्यातील कापूसवाडीच्या ६ जणांना १० वर्षे सक्तमजुरी
जळगाव- जागेच्या वादातून जामनेर तालुक्यातील कापूसवाडीतील प्रवीण ज्ञानदेव गोपाळ या तरूणाला सहा जणांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते़ त्यानंतर त्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता़ सोमवारी न्या.आऱ जेक़टारिया यांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़
देवीदास भिका नवघरे, कैलास नवघरे, शिवराम नवघरे, उत्तम सुबा नवघरे, शिवदास शिवराम नवघरे, विलास शिवराम नवघरे (सर्व रा़ कापूसवाडी, ता़ जामनेर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ या खटल्यात फिर्यादी राजू गोपाळ, मयत प्रवीणची आई सुमनबाई, तपासाधिकारी डी.के. शिरसाठ यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या़