गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:27 IST2024-08-29T11:25:57+5:302024-08-29T11:27:11+5:30
नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- संजय सोनार
चाळीसगाव (जि.जळगाव) : उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या जलप्रकल्पांपैकी एक असलेल्या गिरणा धरणात गुरुवारी सकाळी ६ वाजता ९३.७५ टक्के जलसाठा झाला आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता धरणाचे ६ दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले आहेत.
नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाची पाणीधार असणारे माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्यावर्षी कोरडेठाक असणाऱ्या मन्याड धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
चाळीसगाव (जि.जळगाव) : गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/8BvYAgM7J3
— Lokmat (@lokmat) August 29, 2024