जीएमसीतील सिटू कक्ष नॉन कोविड म्यूकरमायकोसिसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST2021-05-26T04:16:54+5:302021-05-26T04:16:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : म्यूकरमायकोसिस असलेल्या मात्र, नॉन कोविड अशा रुग्णांवर उपचारासाठी अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ...

In situ room at GMC ready for non-covid mucormycosis | जीएमसीतील सिटू कक्ष नॉन कोविड म्यूकरमायकोसिसाठी सज्ज

जीएमसीतील सिटू कक्ष नॉन कोविड म्यूकरमायकोसिसाठी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : म्यूकरमायकोसिस असलेल्या मात्र, नॉन कोविड अशा रुग्णांवर उपचारासाठी अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सीटू या कक्षात नियोजन करण्यात आले असून हा कक्ष शुक्रवारपासून सेवेत येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. दरम्यान, रुग्णांना लागणाऱ्या औषधींबाबत रुग्णालय प्रशासनाने आधीच शासनाकडे आगाऊ औषधींची मागणी नोंदविली असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाभरात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. अशा स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या कोविड असलेल्या व म्यूकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णांसाठी कक्ष ७ मध्ये व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर नॉन कोविड असलेल्या मात्र, त्यांना या आजाराची लागण झाल्याने अशा रुग्णांवर योजनेत उपचार कुठे करावे, असा प्रश्न होता. त्यासाठी जळगाव शहरात व्यवस्था म्हणून आता सी टू कक्षात स्वच्छता करण्यात आली असून कक्षाचे उर्वरित बेड स्वच्छतेचे काम हे मंगळवारी करण्यात आले या ठिकाणी काही परिचारिकांची ड्युटीही लावण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत हा कक्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: In situ room at GMC ready for non-covid mucormycosis