भडगाव येथे श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:56 IST2019-01-08T19:53:57+5:302019-01-08T19:56:18+5:30

तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी भडगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

Shri Sant Jagannada Maharaj's death anniversary celebrated in Bhadgaon | भडगाव येथे श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी

भडगाव येथे श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी

ठळक मुद्देसमाजबांधवांच्या मागणीनुसार, सभामंडपासाठी निधी देऊसमाजबांधवांचा उल्लेखनिय कार्याबद्दल सन्मान

भडगाव, जि.जळगाव : तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त वाणी समाज मंगल कार्यालय कार्यक्रम झाला.
प्रमुख अतिथी आमदार किशोर पाटील यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वालन केले. मुख्याधिकारी विकास नवाळे, उपनगराध्यक्ष डॉ.वसीम मिर्झा, नगरसेवक सुनील देशमुख, नगरसेवक अतुल पाटील, नगरसेविका योजना पाटील, नगरसेविका प्राजक्ता देशमुख, संतोष महाजन, जगन भोई, डॉ.प्रमोद पाटील, उत्तमराव चौधरी, शिवसेना शहरप्रमुख, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, विजय शांताराम चौधरी, संजय चौधरी, अजय चौधरी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक कैलास चौधरी यांनी, सूत्रसंचालन शिवसेना शहरप्रमुख, माजी नगरसेवक मनोहर चौधरी यांनी, तर आभार विशाल चौधरी यांनी मानले.
या वेळी भडगाव व जळगाव झोन बॉडी बिल्डर राहुल चौधरी यांचा व तेली समाज महिला मंडळ स्थापन करून अध्यक्षा संगीता चौधरी व उपाध्यक्षा सरला चौधरी यांचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक मंडळ तालुकाध्यक्ष विशाल चौधरी, शहराध्यक्ष राहुल चौधरी, हर्षल चौधरी, विजय चौधरी, मनोज चौधरी, गणेश चौधरी, नंदू चौधरी, महेश चौधरी, अजय चौधरी, जयंत चौधरी, भगवान चौधरी, श्याम चौधरी, गोकुल चौधरी आदींनी परिश्रम घेतले .

Web Title: Shri Sant Jagannada Maharaj's death anniversary celebrated in Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.