मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:25 IST2019-09-09T18:22:53+5:302019-09-09T18:25:06+5:30

गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.

Shri immersion was done by assisting the heirs of the family | मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन

मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन

ठळक मुद्देअनिष्ट रूढींना फाटा भंडाऱ्याचे कार्यक्रम रद्द करून मंडळाचा सामाजिक ऐक्याचा आदर्शतालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपचा पुढाकारलोकमत शुभ वर्तमानत्या कुटुंबाचे अश्रू अनावरसाक्षात गणेशच कार्यकर्त्यांच्या रूपाने मदतीला आला

अमळनेर, जि.जळगाव : गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे.
गणेशोत्सव म्हणजे भंडारा, महाप्रसाद विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री यावर प्रचंड खर्च करून पैशाची उधळपट्टी केली जाते. मात्र अंतुर्ली रंजाने या गावात गणेशोत्सव काळात सहा दिवसात मातंग समाजाचे राकेश रोहिदास म्हस्के वय २२), शिंपी समाजाचे मधुकर पीतांबर शिंपी (वय ६०), मागासवर्गीय समाजाचे भाईदास केशव जगदेव यांचे निधन झाले. त्यामुळे या तीन समाजातील परिवार पोरका झाला.
कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबातील इतर सदस्यांवर संकट कोसळले म्हणून स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपचे अध्यक्ष अनिल धोबी, उपाध्यक्ष योगेश सैंदाणे, महेश पाटील, कार्याध्यक्ष सतीश पाटील, सचिन सैंदाणे यांनी सामूहिकरित्या निर्णय घेऊन सातव्या दिवशी विसर्जनाच्या वेळी बँड, डीजे वाजवायचे नाही आणि महाप्रसाद, भंडारा आदी कार्यक्रम रद्द केले. बचत केलेल्या या पैशातून तिन्ही कुटुंबांच्या सदस्यांना संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि तीन महिन्यांचा किराणा सामान असे साहित्य घेऊन दिले. ते सरपंच शीतल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्या कुटुंबाचे अश्रू अनावर झाले. साक्षात गणेशच कार्यकर्त्यांच्या रूपाने मदतीला आला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
तिन्ही वेगवेगळ्या समाजाच्या कुटुंबांना मदत करून स्वराज्य मंडळाने व कमांडो ग्रुपने सामाजिक ऐक्य दाखवले आणि रूढी परंपरांना फाटा देऊन खºया भक्तीची दिशा दाखवली. याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. मंडळाने कोणतीही वाजंत्री न वाजता साध्या पद्धतीने मिरवणूक काढली. अजय गायकवाड, राकेश गरुड, गणेश जगताप, गणेश म्हस्के, सुनील शेवाळे, नारायण पाटील, बापू शिक्रापूर, समाधान गरुड, विकास शिरसाठ, विजय पाटील, अनिल गायकवाड, गणेश अवसरे आदी उपस्थित होते.

Web Title: Shri immersion was done by assisting the heirs of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.