लोंढ्रीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:39 IST2019-04-08T16:37:26+5:302019-04-08T16:39:23+5:30

एकवटला गाव : रात्री बारा पर्यंत काम करीत टकेडीवर पाडले चर

Shramdan of the villagers for drinking water | लोंढ्रीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे श्रमदान

लोंढ्रीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे श्रमदान


पहूर, ता. जामनेर : उजाडलेले रान, कोरडंठाक पडलेली धरणे, ओढे, विहीरी अशा दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी लोंढ्री ता. जामनेर येथील गावकरी पश्रमदानासाठी सरसावले असून रविवारी रात्री बारा पर्यंत काम करुन टेकडीवर चर पादडले आहेत. तसेच जंगलात तब्बल ४५ दिवस गावकरी श्रमदान करणार असून जागोजागी शोषखड्डे केले जाणार आहेत.
पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत लोंढ्री गावाचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी गावातील काही युवक व महिलांना पाणी फाऊंडेशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यामुळे काही महिन्यांपासून गावकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून एकजूट करून श्रमदान करीत आहेत. त्यामुळेच दोन जुने आड व एक हात पंप पूर्नजिवीत करून पाण्याच्या जलधारा गावकऱ्यांना पहावयास मिळत आहे.
भुमीपुत्र पोलीस
अधीक्षकांचा पुढाकार
याकामी लोंढ्रीचे भुमीपूत्र तथा नंदुरबारचे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन गावाला एकत्रित करून मला दोन हात व दोन तास द्या अशी हाक दिल्यानंतर लोंढ्रीगाव पाणीदार करण्यासाठी गावकरी श्रमदानाला लागले आहेत. राहून पाटील मार्गदर्शन करीत आहे. कामांचा आढावा नाशिकचे कार्यकारी अभियंता विश्राम पाटील, जैन इरिगेशनचे डॉ. विलास पाटील, बँकेचे व्यवस्थापक निखिल जोशी, पाणी फाऊंडेशनचे तालुका सम्नवयक अश्विन राजपूत, सुनील दुराडे कामांचा आढावा घेत आहेत. तर राजमल भागवत, निंबाजी पाटील, रघुनाथ पाटील, राजाराम चौधरी, भागचंद चव्हाण, राजू जैन काशीनाथ भागवत शत्रघ्न पाटील, डॉ. सुभाष चिकटे, आकाश भागवत, दिलीप पाटील, गोपाल पाटील, बापू चौधरी, शिरीष जैन यांच्यासह गावकरी स्वयंस्फूर्तीने श्रमदानासाठी पुढे आले आहेत.
दिंडीने श्रमदानाला प्रारंभ
गावाजवळील कान्होबा टेकडीजवळील जंगलात रविवारी रात्री श्रमदान करण्याचे नियोजित झाल्याने डॉ. सुभाष चिकटे, गोपाळ पाटील, आकाश भागवत, निखिल जोशी, पाणी फाऊंडेशनचे सुनिल दुराडे व अधिकारी यांनी जागेवर जाऊन मोजमाप केले. संध्याकाळी गावातून टाळ - मृदुंंगाच्या गजरात गावकºयांना श्रमदानासाठी निमंत्रण देत दिंडी थेट कामाच्या ठिकाणी टिक्कम, फावडे व टोपले घेऊन पोहचले. यात महिला अबालवृद्ध, तरुण सहभागी झाले होते.
नंदुरबार व जळगाव पोलीस अधीक्षक एक दिवस करणार काम
ज्यांच्या पुढाकारातून गाव पाणी दार करण्यात येत आहे. ते नंदुरबार चे पोलिस अधीक्षक संजय पाटील व जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे गावाकºयांचा उत्साह वाढविण्यासाठी २३ तारखेनंतर आपल्या परीवारासह लोढ्री येथील गावकºयांसोबत श्रमदान करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्याकडून माहिती गावकºयांकडून मिळाली आहे.
साठ हजार लीटर पाणी जमिनीत मुरणार
कान्होबा टेकडीवर दोन फुट लांब दोन फुट खोल व पस्तीस मीटर लांब असे अकरा चर गावकºयांच्या श्रमदानातून करण्यात आले आहे. पहिल्या पावसात जवळपास यात साठ हजार लीटर पाणी जमिनीत मुरणार असल्याने भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. दरोरोज शंभर मीटर नियोजित कामाचे स्वरूप असून २६०० घनमीटर प्रर्यंत कामाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. ४५दिवस हे काम चालणार आहे.
आर्थिक मदतीसाठी बँकेत खाते
या कामासाठी आर्थिक मदत लागणार असल्याने गावातील भुमीपूत्रांना मदतीचे आवाहन करण्यात आले असून यासाठी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. जवळपास ४०ते ५० हजार मदत जमा झाली आहे. तसेच मदतीचा ओघ सुरु आहे. बाहेरगावी नोकरी निमित्त असलेले लोंढ्रीकर गावासाठी पुढे येत आहेत.

Web Title: Shramdan of the villagers for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.