पीक पाहणी पेरा नोंदणीस अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:06+5:302021-09-19T04:17:06+5:30
रावेर : ऑनलाईन पीक पेरा नोंदणीस तालुक्यात अल्प प्रतिसाद असून शेतकऱ्यांनी अडाणी, अशिक्षित, अज्ञान वा अपंगत्वामुळे शक्य नसल्यास ...

पीक पाहणी पेरा नोंदणीस अल्प प्रतिसाद
रावेर : ऑनलाईन पीक पेरा नोंदणीस तालुक्यात अल्प प्रतिसाद असून शेतकऱ्यांनी अडाणी, अशिक्षित, अज्ञान वा अपंगत्वामुळे शक्य नसल्यास घरातील युवक, भाऊबंदकी वा गावकीच्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या तथा महसूल सजेवरील कर्मचारींच्या मदतीने ई-पीक नोंदणी करावी, असे आवाहन येथील कार्यशाळेत उषाराणी देवगुणे यांनी केले. अन्यथा नुकसान तुम्हा शेतकरी बांधवांचे होणार असल्याचे तहसीलदार देवगुणे यांनी सांगितले.
खानापूर ग्रामसचिवालयात खानापूर महसूल भाग मंडळातील शेतकऱ्यांसाठी ही कार्यशाळेत झाली. उपसरपंच सचिन भारते अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी, उपसरपंच सचिन भारते, ग्रापं सदस्य रशीद शेख व छगन चौधरी तथा खानापूर महसूल भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी देवगुणे यांचे स्वागत केले. वाघोड साजा तलाठी यासिन तडवी यांनी प्रास्ताविक केले.
दरम्यान, खानापूर महसूल भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
खानापूर तलाठी सजेत ५६१ खातेदारांपैकी केवळ २१८ खातेदारांनी नोंदणी केली आहे. यात पाडळे येथे २८६ पैकी १४२, निरूळ येथील ४१८ पैकी १०५, अजनाड येथील ५४२ पैकी २० खातेदारांनी नोंदणी केली नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी ई-पीक नोंदणीत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या असता, माधव तेली यांनी फोटो अपलोड होत नसून थेट ॲप्सच्या बाहेर पडावे लागत असल्याची व्यथा मांडली. शेतकरी संजय बोंडे यांनी एकाच शेतकऱ्यांचे वेगवेगळे खाते नंबर अपलोड होत नसल्याची अडचण मांडली. अजनाड येथील शेतकऱ्याने चार चार वेळा शेतात जाऊनही ई पीक नोंदणी होत नसल्याने फ्लो चार्ट लावून जनजागृती करण्याचा त्रागा व्यक्त केला. अजनाड येथील सुभाष महाजन यांनी तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, अशी कमांड येत असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी मार्गदर्शन करतांना ज्या ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत असतील त्यांनी तलाठी, मंडळाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ज्या तांत्रिक अडचणी तालुका वा जिल्हा स्तरावर सुटणे शक्य नसतील त्यांची यादी तयार करून पुणे येथे पुढील मार्गदर्शनासाठी पाठवल्या जाणार आहेत. भरडधान्य खरेदी केंद्रावरील नोंदणीसाठी ऑनलाइन सातबारा अत्यावश्यक असल्याने ई-पीक नोंदणी प्राधान्याने करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी अजनाड येथील ग्रा. पं. सदस्य संपत चौधरी, सुभाष महाजन, युवराज महाजन, प्रल्हाद महाजन, महेंद्र पाटील, खानापूर येथील ग्रा. पं. सदस्य संजय धांडे, डॉ. सुरेश पाटील, अशोक धांडे, योगेश्वर महाजन, सुपडू धांडे, शांताराम पाटील, मनोहर पाटील, गोपाळ सोनार, भागवत धांडे, डिगंबर बारी, मधुकर नेमाडे, राधेश्याम धांडे, रामेश्वर पाटील, कैलास धांडे, शंकर पाटील, जितेंद्र राजपूत, दिवाकर महाजन, पुरुषोत्तम चौधरी, शंभू जाधवनिरूळ येथील महेंद्र जाधव, जगन्नाथ चौधरी, सुरेश खैरे आदी उपस्थित होते.
महसूल भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील, केर्हाळे सजा तलाठी शैलेश झोटे, वाघोड सजा तलाठी यासीन तडवी, खानापूर सजा तलाठी गोपाळ भगत, अटवाडे सजा तलाठी रवी शिंगणे, मोरगाव सजा तलाठी काजल पाटील, कोतवाल मिलिंद गाढे, बापू धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले.
विठोबा पाटील हे कार्यशाळेत ई पीक पाहणीचे प्रात्यक्षिक सादर करताना. व्यासपीठावर तहसीलदार उषाराणी देवगुणे व उपसरपंच सचिन भारते आदी.