अक्सा नगरात दुकान फोडून २२ हजाराची रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:04 IST2020-12-23T21:04:17+5:302020-12-23T21:04:29+5:30

जळगाव : मेहरुणमधील अक्सा नगरात इक्रामुद्दीन शफीद्दीन शेख (५५,रा.फिरदोस नगर) यांचे जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी २२ ...

A shop was burglarized in Axa Nagar and Rs 22,000 cash was stolen | अक्सा नगरात दुकान फोडून २२ हजाराची रोकड लांबविली

अक्सा नगरात दुकान फोडून २२ हजाराची रोकड लांबविली

जळगाव : मेहरुणमधील अक्सा नगरात इक्रामुद्दीन शफीद्दीन शेख (५५,रा.फिरदोस नगर) यांचे जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी २२ हजार रुपयांची रोकड व सहाशे रुपयांचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाद दाखल करण्यात आला आहे. इक्रामुद्दीन शेख यांचे अक्सा नगरात दुकान आहे. २१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दुकान बंद केले होते. २२ रोजी सकाळी ९ वाजता दुकानावर आले असता शटर वर जात नव्हते. इतर लोकांच्या मदतीने शटर उचकाविण्याचा प्रयत्न केला असता शटरचे वरचे कव्हर वाकलेले दिसले. आतमध्ये साहित्याची नासधूस झालेली होती तर गल्लयातील २२ हजार रुपये रोख व मोबाईलही गायब होता. चोरीचा प्रकार असल्याची खात्री झाल्यावर शेख यांनी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहायक फौजदार अतुल वंजारी या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

Web Title: A shop was burglarized in Axa Nagar and Rs 22,000 cash was stolen