शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दारु न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार; यावलनजीकची घटना, दोघे हल्लोखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 00:22 IST

दारू देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

सुधीर चौधरी

जळगाव: यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर गुरुवारी रात्री ९.३० वाजता  हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. प्रमोद श्रीराम बाविस्कर ( ५०, रा. चंदू अण्णा नगर, जळगाव) असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

प्रमोद बाविस्कर गुरुवारी रात्री ९.३० वाजता आपले हॉटेल रायबा हे बंद करून जळगावला जाण्यासाठी कारमध्ये बसले. त्याच वेळी दोन जण त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी हॉटेल सुरू करून दारू देण्याची मागणी केली. बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या हल्लेखोरांनी थेट प्रमोद बाविस्कर यांच्या दिशेने गोळीबार केला.

यात बाविस्कर यांच्या मानेला गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर  पळून गेले. बाविस्कर यांचा मुलगा आणि इतर कर्मचाऱ्यांनी  तातडीने  त्यांना जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात  दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

घटनेची माहिती मिळताच यावलचे  पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली.  रात्री उशिरापर्यंत अज्ञातांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले होते.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस