वरणगाव : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे वरणगाव शहरातील बस स्टँड चौकात दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महिला उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, शहराध्यक्षा रंजना पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, माजी नगरसेविका रोहिणी जावळे, नसरीनबी साजिद कुरेशी, वैशाली मराठे, प्रतिभा सोनवणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय. आर.पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, पप्पू जकातदार, प्रकाश नारखेडे, कैलास माळी, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, अनिल चौधरी, रवी पाटील, इफ्तेखार मिर्झा, जितू मराठे, शेख रिजवान, महेश सोनवणे, सोहेल कुरेशी, पिंटू धोबी, कौस्तुभ पाटील, राजेश इंगळे, जितेंद्र तावडे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.