शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

धक्कादायक व्हीडिओ व्हायरल- सुलेमानी पत्थर धारण केल्यास टळतो धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 17:24 IST

सुलेमानी पत्थर धारण केल्यास धिका टळतो, अशी अंधश्रद्धा आहे.

ठळक मुद्देसुलेमानी पत्थर देण्याच्या नावाने गंडविणाऱ्या टोळ्या सक्रियदेशभरात टोळ्या सक्रियलालसेपोटी अनेक जण पडतात बळीयाआधी पोलिसात गुन्हेही दाखल

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : दुर्मिळ आणि खरा सुलेमानी पत्थर धारण केल्यास चाकू, तलवारचा वार शरीराला हानी पोहचवू शकत नाही, मानवी अंगावर ब्लेड चालवले तरी रक्त निघणार नाही, केसांवर कैची चालणार नाही यासह अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातून अनेकांना लाखो रुपयात गंडविले जात आहे. वैज्ञानिक दृष्टीने अशक्य बाबी दाखविणाऱ्या या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुलेमानी पत्थर उपलब्ध करून देण्याच्या नावावर गंडविणाऱ्या टोळ्यांचे कनेक्शन तालुक्यातील आदिवासी भागाशी जुळले असून, अनेक टोळ्या यात सक्रिय झाल्या आहेत.मूळात देशातील बद्रीनाथ केदारनाथपासून तर कन्याकुमारीपर्यंत रुद्राक्ष माळ, मणी आणि विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या तालुक्यातील आदिवासी काहींनी दुर्मिळ पुरातन वस्तू उदा. रत्ने, गुणधर्म असलेल्या वनस्पती आदी वस्तू आमच्याकडे उपलब्ध आल्याचे भासवितात आणि भौतिक सुखामागे धावणाऱ्या गडगंज संपत्तीधारक मानसिक सुखशांतीसाठी कथित दुर्मिळ पुरातन वस्तू मिळविण्यासाठी पाहिजे ती रक्कम मोजून या टोळ्यांच्या आमिषाला बळी पडतात.सोशल मीडियावर मार्केटिंगअगदी लॉकडाउनच्या काळात व्हाट्सएप, यू ट्युबच्या साह्याने सुलेमानी पत्थरची मार्केटिंग विशिष्ट क्षेत्रात सुरू आहे हे विशेष. गेल्या अनेक वर्षांपासून नागमणीच्या नावाखाली देशातील विविध राज्यातील मोठमोठे ठेकेदार, व्यापारी, पुढाऱ्यांचे नातेवाईक आणि प्रतिष्ठितांना गंडविण्याचे प्रकार घडले. काही प्रकरणात पोलिसात गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यात बहुतांश प्रकरणात तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी येथील काही फासेपारधी संशयित आरोपी आहेत. नागमणी हा प्रकार जुना झाल्याने आता या संशयित व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुलेमानी पत्थरच्या नावाखाली देशपातळीवर विविध टोळ्यांच्या माध्यमातून मालदार लोकांना गंडविणे सुरू केले आहे. या कथित चमत्कारी सुलेमानी पत्थरमार्फत केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्यामुळे भ्रमित झालेले नागरिक या टोळ्यांना बळी पडत आहेत.सुलेमानी पत्थर आणि अंधविश्वासतंत्र मंत्र, जादूटोणा होत नाही, जवळ बाळगल्यास विपूल धनसंपदा लाभते, शत्रूचा धोका टळतो, सुखशांती लाभते आणि आरोग्यास बाधा होत नाही, अगदी धारदार वस्तूदेखील शरीराला इजा पोहचवू शकत नाही, इतकेच नव्हे तर डोक्यावरील केस कैचीनेही कापले जात नाही अशा कथित विविध कारणांनी चमत्कारिक सुलेमानी पत्थर प्रसिद्धीसआला आहे. वास्तविक हा सामान्य प्रकारचा भूगर्भात मिळून येणारा पत्थर आहे. त्यास सुलेमानी हकीक म्हणून ओळख आहे, हा हकीक सर्वत्र व सहज उपलब्ध आहे. यमन देशात मिळून येणाऱ्या सुलेमानी हकीक दर्जेदार म्हणून ओळखला जातो. शांत आणि संयमी गुणधर्म म्हणून हा अंगठीत मढवून घालणारे शौकीन आहेत.अशिक्षित गंडवितात उच्च शिक्षितांनाया सुलेमानी पत्थरच्या नावाखाली अशिक्षित आदिवासी, उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू नागरिकांना लाखो रुपयांचा चुना लावत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहे. यासाठी विविध टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. व्हाट्सएप आणि यू ट्युबवरील केलेले व्हिडिओ भुरळ पडलेल्या नागरिकांना पाठवून त्यांना या भागात बोलविण्यात येते आणि ते कुऱ्हा भागात आल्यानंतर त्यांची लुटमार केली जाते. अशी अनेक उदाहरणे घडली असून, परप्रांतीय ग्राहकाना लुटमारनंतर पोलिसांची भीती दाखवून येथून हाकलले जाते.एखाद्या प्रकरणात लुटमार झालेले पोलिसांपर्यंत येतात. तेव्हा या साखळीत सामील काही पोलीस कर्मचारी व अधिकारी लुटले गेलेल्यांवर प्रश्न-उत्तराची सरबत्ती करून भांबवतात आणि काढता पाय घेत असल्याचे आरोप या भागात सर्रास होत असतात. एखाद्या प्रकरणात ज्याची लूट झाली अशांचे हात वरपर्यंत असल्यास गुन्हेही दाखल होतात. नुकतेच गेल्या वर्षअखेरीस मुक्ताईनगर पोलिसात सुलेमानी पत्थरबाबत गुन्हाही दाखल झाला आहे.हातचलाखीवर कसोटीसुलेमानी पत्थरच्या नावाखाली वेगवेगळे प्रात्यक्षिक करून लोकांचा विश्वास संपादन केला जातो. यात हातात सुलेमानी पत्थर देऊन हातावर ब्लेड चालविणे, कैचीने केस कापले जात नसल्याचे पटवून देणे आणि नेलकटरने नखदेखील कापले जात नसल्याचे हातचलाखी करवून दाखविली जाते. यामुळे कथित सुलेमानी पत्थर दुर्मीळ आणि खरा असल्याचे पटविले जाते व बख्खळ रकमा उपटल्या जातात. प्रसंगी लूटमारही केली जाते.भूगर्भातून मिळालेल्या रत्न, पाचू पत्थर अशांमध्ये काही एलीमेन्ट असतात जे काही अंशी धारण केल्यावर परिणाम करतात, अशी मान्यता वजा अशी धारणा आहे. त्यात सुलेमानी पत्थर हा हकीक प्रकारात मोडला जाणारा पत्थर होय. सामान्यत: हा सहज उपलब्ध होतो. मात्र याबाबतचे होणारे दावे, तर्कशुद्ध व वैज्ञानिक दृष्टीने फसवणूक करणारे, खोटे आहेत.

-सचिन जैन, सराफ व्यवसायिक, मुक्ताईनगर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMuktainagarमुक्ताईनगर