धक्कादायक...... रुग्णालयातीलच तिघांनी केला परिचारिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:50 IST2019-12-29T23:49:45+5:302019-12-29T23:50:19+5:30
जळगाव : खाजगी बाल रुग्णालयातील एका पारिचारिकेचा रुग्णालयातच काम करणाऱ्या तिघांनी छळ करत विनयभंग केल्याची घटना रविवारी समोर आली ...

धक्कादायक...... रुग्णालयातीलच तिघांनी केला परिचारिकेचा विनयभंग
जळगाव : खाजगी बाल रुग्णालयातील एका पारिचारिकेचा रुग्णालयातच काम करणाऱ्या तिघांनी छळ करत विनयभंग केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. याप्रकरणी गौरव सुरडकर, आमिर तडवी, प्रदीप पाटील या तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात विनयभंग तसेच आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या तिघा तरुणांनी तरुणीच्या नावाने टिकटॉक व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याचेही समोर आले असून हा व्हिडीओ तरुणीने पोलिसांना दिला आहे.
ही तरुणी या रुग्णालयात तीन ते चार वषार्पासून काम करते.