शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीसाठी उमेदवाराने स्वतःच्याच घरावर गोळीबार केल्याचं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:50 IST

उमेदवारासह तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

जळगाव :जळगाव शहर मतदारसंघात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या घरावर गोळीबाराची घटना मेहरुण परिसरात १८ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली होती. या गुन्ह्याच्या तपासात या उमेदवारानेच मुलगा, शालक व त्याच्या मित्राच्या मदतीने सहानुभूती मिळविण्यासाठी स्वतःच्या घरावर गोळीबार केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. यात उमेदवारासह तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून मेहरुण परिसरातील शेरा चौकात राहणारे निवृत्त शिक्षक अहमद हुसेन शेख (वय ५०) यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. निवडणुकी दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता शेख कुटुंबीय साखर झोपेत असतानाच दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी घरावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. उमेदवार शेख अहमद शेख हुसेन याचा शालक इरफान अहमद (वय ३२, रा. मालेगाव) हा त्याचा मित्र मोहम्मद शफिक उर्फ बाबा (रा. मालेगाव) याच्यासोबत १७ नोव्हेंबर रोजी रात्री मालेगावहून जळगावला आले. त्यानंतर पहाटे ४ वाजेच्या सुमारास मोहम्मद शफिक उर्फ बाबाने इरफान अहमदसोबत येऊन घरावर गोळीबार केल्याचे या तपासात निष्पन्न झाले आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी इरफान मोहम्मद याला मालेगावमधून ताब्यात घेतले. तर त्याच्यासह उमेदवार असलेल्या अहमद शेख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उमेदवाराचा मोठा मुलगा शिबान हुसेन (वय २३, रा. शेरा चौक, मेहरुण) यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मोहम्मद शफिक उर्फ बाबा व उमर शेख फारुख हे दोन्ही संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४