CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 08:48 IST2020-05-10T08:47:43+5:302020-05-10T08:48:24+5:30
CoronaVirus Marathi News: 59 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर अकरा व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले
भुसावळ: जळगाव, अमळनेर, भुसावळ येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 70 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 59 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर अकरा व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये अमळनेर येथील एक 58 वर्षीय महिला, भुसावळ येथील चार ( 32, 50, 52, 64 वर्षीय) पुरुषांचा तर जळगाव शहरातील पवननगर व इतर भागातील सहा (यामध्ये 14 वर्षीय मुलगी, 38, 55, 70 वर्षीय महिलांचा तर 46 व 70 वर्षीय पुरुषांचा) व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 174 झाली आहे. यापैकी 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर तीन व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे.,अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.