शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना करणार भाजपाशी चर्चा

By admin | Updated: February 3, 2015 17:21 IST

शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंबंधी आपली भूमिका ठरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत भाजपासोबत चर्चा करण्याचे निश्‍चित केले आहे.

जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पहिला टप्पा सुरू झालेला असतानाच राजकीय पक्षांमध्ये मात्र अजून चर्चा सुरू नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात. परंतु शिवसेनेने या निवडणुकीसंबंधी आपली भूमिका ठरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत भाजपासोबत चर्चा करण्याचे निश्‍चित केले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंबंधी पात्र विविध कार्यकारी सोसायट्या व इतर सभासद संस्थांचे मतदानासंबंधीचे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मागविले आहेत. तसेच मुदत संपलेल्या संस्थांची निवडणूक घेऊन या संस्थांचे ठरावही घेण्याची तयारी केली आहे. प्रशासकीय पातळीवर ही प्रक्रिया सुरू आहे. गत निवडणुकीत भाजपाच्या मंडळीसोबत जाऊन सहकार पॅनेल स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या शिवसेनेने अजून कुठलीही चर्चा सुरू नाही, असे म्हटले आहे.मागील निवडणुकीत शिवसेनेचे सुरेशदादा जैन, चिमणराव पाटील, माजी आमदार कैलास पाटील, किशोर पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे ही मंडळी सहकार पॅनेलमधून ही मंडळी निवडून आली होती. उपनेतेही इच्छुकया निवडणुकीत मात्र शिवसेनेची मंडळी कुणासोबत जाईल, हे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले नाही. जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यात उपनेते गुलाबराव पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे आणि किशोर पाटील यांचा समावेश आहे. पैकी प्रा.सोनवणे व किशोर पाटील हे विद्यमान संचालक आहेत. त्यातच जिल्हा बँकेचे वरिष्ठ व अनुभवी सदस्य म्हणून ओळख असलेले चिमणराव पाटील यांच्या भूमिकेला बँकेच्या राजकारणात महत्त्व राहील. अर्थातच सेनेचे चिमणराव पाटील, किशोर पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे हे पुन्हा एकदा जिल्हा बँक निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील, असे संकेत मिळत आहेत. तसेच उपनेते गुलाबराव पाटील हेदेखील धरणगाव तालुक्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. पण या वृत्ताबाबत उपनेत्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेले नाही. चर्चा करणारयासंदर्भात आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत आमच्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. सध्या कुणासोबतही चर्चा सुरू नाही किंवा चर्चाही केलेली नाही. परंतु लवकरच मुंबईत महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासोबत चर्चा करू, असेही ते म्हणाले.

-------

शिवसेनेची जिल्हा बँक निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची राहील. पण अजून कोणतीही चर्चा कुठल्याही नेत्याशी, पक्षाशी झालेली नाही. समविचारी, बँकेचे हित जोपासणार्‍या पॅनेलसोबत जाऊ. -गुलाबराव पाटील, उपनेते, शिवसेना