शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:15+5:302021-07-14T04:20:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रावेर : तालुक्यातील शिवसेनेच्या गाव तेथे शाखा पोहचवून सभासद नोंदणी करून प्रत्येक शाखेवर जाऊन १२ ते ...

शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : तालुक्यातील शिवसेनेच्या गाव तेथे शाखा पोहचवून सभासद नोंदणी करून प्रत्येक शाखेवर जाऊन १२ ते २७ जुलै दरम्यान शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवून हे रयतेचे राज्य असल्याची अनुभूती जनसामान्यांना करून देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. रावेर पीपल्स को-ऑप. बँक सभागृहात तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाव तेथे शाखा स्थापन करणे, सभासद नोंदणी करणे, गावागावात जनकल्याणाच्या शासन योजनांचे थेट रसातळात अभिसरण होते किंवा नाही याचा आढावा घेणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे आदी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. या शिवसंपर्क अभियानांतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तालुक्यात एक दिवसाची उपस्थिती लाभणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख योगिराज पाटील यांनी शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबवणार असल्याचे आश्वासित केले. शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख पंकज राणे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित, शहरप्रमुख नितीन महाजन, युवासेनेचे शहरप्रमुख राकेश घोरपडे, तालुका संघटक अशोक शिंदे, छोटू पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.