शिरसोलीच्या तरुणाची रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:12 IST2018-08-31T20:10:13+5:302018-08-31T20:12:34+5:30
जळगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या झेलम एक्सप्रेससमोर स्वत:ला झोकून देत नीलेश सुधाकर पाटील (वय-२५, रा़ शिरसोली) या तरूणाने आत्महत्या केली़

शिरसोलीच्या तरुणाची रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या
जळगाव - जळगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या झेलम एक्सप्रेससमोर स्वत:ला झोकून देत नीलेश सुधाकर पाटील (वय-२५, रा़ शिरसोली) या तरूणाने आत्महत्या केली़ ही घटना मध्य रेल्वेच्या शिरसोली-दापोरा दरम्यान रेल्वेलाईनवर शुक्रवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे शिरसोली प्ऱबो़मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
नीलेश हा आई, भाऊ तसेच बहिणींसोबत वास्तव करीत होता़ बांधकाम क्षेत्रात सेंट्रींग कारागीर म्हणून काम करायचा़ तो गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बाहेर जातो आहे, असे सांगून घराबाहेर पडला़ रात्री बराच उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याचा मोठा भाऊ दत्तू पाटील, काका भगवान सुकदेव पाटील यांनी त्याचा शोध घेतला़ मात्र, तो कुठही आढळून आला नाही़ दरम्यान, शिरसोली-दापोरा दरम्यान रेल्वेलाईनवर शुक्रवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणाºया झेलम एक्सप्रेसखाली स्वत: ला झोकून देत आत्महत्या केली़ हा प्रकार बघितल्यानंतर लोको पायलटने शिरसोली येथील स्टेशन मास्तरला माहिती कळवली. नंतर त्यांनी शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना ही घटना कळवली.