शिरसोली येथे चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:29 IST2018-05-16T16:29:46+5:302018-05-16T16:29:46+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन वंदना रवींद्र महाजन (वय ४०) या महिलेला घराशेजारी दोघांनी रॉकेल टाकून पेटविल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजता शिरसोली प्र.न. (ता.जळगाव) येथे घडली.

In Shirsoli, a woman was charred by the suspicion of character | शिरसोली येथे चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला पेटविले

शिरसोली येथे चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला पेटविले

ठळक मुद्देशिरसोली येथील घटनापीडित महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरुनायब तहसीलदारांनी घेतला जबाब

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१६ : चारित्र्यावर संशय घेऊन वंदना रवींद्र महाजन (वय ४०) या महिलेला घराशेजारी दोघांनी रॉकेल टाकून पेटविल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजता शिरसोली प्र.न. (ता.जळगाव) येथे घडली. याप्रकरणी बापू सिताराम महाजन व सुभाष रामभाऊ महाजन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर वर्षा बापू महाजन व रेखा महाजन या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेत वंदना ८५ टक्के जळाल्या असून त्यांची मृत्यूशी झुजं सुरु आहे.
वंदना महाजन यांच्या पतीचे निधन झाले आहे. मुलगी राणी ही विवाहित असून यावल येथे सासरी तर मुलगा हरीष हा पुणे येथे कंपनीत नोकरीला आहे. त्यामुळे वंदना या शिरसोली येथे एकट्याच राहतात. वंदना महाजन यांनी दिलेल्या जबाबानुसार, मध्यरात्री दोन वाजता वंदना या घरात एकट्या झोपल्या असतांना ही घटना घडली. पीडित महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नायब तहसीलदार यांनी बुधवारी सकाळी पोलिसांसमक्ष जळीत महिलेचा जबाब नोंदविला.

Web Title: In Shirsoli, a woman was charred by the suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.