शेंड्याची पोलीस कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST2021-05-01T04:15:19+5:302021-05-01T04:15:19+5:30
==================== आज रक्तदान शिबिर जळगाव : कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागिर ...

शेंड्याची पोलीस कोठडीत रवानगी
====================
आज रक्तदान शिबिर
जळगाव : कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी १० वाजता रथ चौकातील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मयूर बारी यांनी केले आहे.
===================
जिल्हा रूग्णालयाजवळ मृतदेह आढळला
जळगाव : जिल्हा रूग्णालच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरूवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील करीत आहेत. त्यांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
===================
सायकल चोरी
जळगाव : द्रौपदी नगरातील योगेश महाजन यांच्या घराच्या कंपाउंडमधून त्यांच्या मुलाची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना २४ मार्च रोजी घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. प्रदीप पाटील तपास करीत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
====================
अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी पन्नास ते पंचावन्न वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरूवारी आढळून आला आहे. अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण करीत आहेत.