९९.८० टक्के मिळवून ‘शानभाग’ची समीक्षा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 23:13 IST2020-07-29T23:12:04+5:302020-07-29T23:13:07+5:30

जळगाव : जळगाव : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै़ बग़ो़शानभाग ...

Shanbhag tops the list with 99.80 percent | ९९.८० टक्के मिळवून ‘शानभाग’ची समीक्षा अव्वल

९९.८० टक्के मिळवून ‘शानभाग’ची समीक्षा अव्वल

जळगाव : जळगाव : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै़ बग़ो़शानभाग विद्यालयाची समीक्षा विजय लुल्हे ही विद्यार्थिनी ९९़८० टक्के मिळवून शहरातून अव्वल ठरली आहे़ तसेच नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयातील माहेश्वरी दीपक नारखेडे ही ९९़६० टक्के मिळवून शहरातून द्वितीय पटकाविला आहे़
दरम्यान, दहावी निकालात शानभाग विद्यालयाची ‘हॅट्ट्रीक’ झाली असून २०१८ मध्ये विशाखा कुलकर्णी या विद्यार्थिनीनंतर २०१९ मध्ये प्रज्ज्वल पाटील आणि आता समीक्षा लुल्हे ही ९९़८० टक्के मिळवून अव्वल ठरली आहे़

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (पुणे) मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला़ यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ९३.५१ टक्के लागला आहे. दरम्यान, निकाल बुधवारी जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती़ अन् दुपारी १ वाजता निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर आपला निकाला पाहीला़ आपण उत्तीर्ण झाल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच पालकांसोबत आनंदोत्सव साजरा केला़ तर कुणी विद्यार्थ्यांनी थेट शाळांमध्ये धाव घेत शिक्षकांचा आर्शिवाद घेतला़ आपल्या शाळेचा किती टक्के निकाल लागला तसेच कुठल्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळाले, यासाठी शिक्षकांसह मुख्याध्यापकांची सुध्दा दुपारच्या सुमारास धावपळ सुरू असल्याचे बघायला मिळाले़

फोनवरचं दिल्या शुभेच्छा
दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना मोबाईलवर संपर्क साधून एकमेकांचा निकाला जाणून घेतला़ नंतर एकमेकांना उत्तीर्ण झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या़ अनेक पालकांनी आपल्या मुलांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला़ त्यात शानभागची समीक्षा लुल्हे हिला सुध्दा आजी सिंधू, आजोबा सुपडू तसेच वडील विजय व मोठी बहिण सुवर्णा यांनी पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला़ दरम्यान, पुढे सी़ए़मध्ये करिअर करण्याचे तिने सांगितले़

Web Title: Shanbhag tops the list with 99.80 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.