राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार स्पर्धेत शानभाग द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 08:43 PM2021-03-04T20:43:27+5:302021-03-04T20:43:27+5:30

जळगाव : नोबेल प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि श्रम साधना ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

Shanbhag II in the state level Nobel Science Prize competition | राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार स्पर्धेत शानभाग द्वितीय

राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार स्पर्धेत शानभाग द्वितीय

Next

जळगाव : नोबेल प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि श्रम साधना ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार स्पर्धेत ब.गो. शानभाग विद्यालयाने द्वितीय पुरस्कार पटकाविला आहे.

विज्ञान क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी या ३ गटात पुरस्कार जाहीर केले जाणार होते. या पुरस्कारात माध्यमिक शाळा गटात एकूण ४० शाळांनी सहभाग घेतलेला होता. या पुरस्कारांची घोषणा नुकतीच पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्र-कुलगुरू डॉ.पी.पी. माहुलीकर यांनी केली असून त्यात माध्यमिक शाळा गटात विवेकानंद प्रतिष्ठान संचालित ब.गो. शानभाग विद्यालयाला विज्ञान प्रेरणा पुरस्कार आणि

बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन यांना द्वितीय पुरस्काराचा सन्मान देण्यात आला. या निवडीमुळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या पुरस्कारासाठी विद्यालयाचे शिक्षक प्रशांत महाजन, हर्षल सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Shanbhag II in the state level Nobel Science Prize competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.