पंजाबमधील दोन तरुणांकडून सात गावठी पिस्तूल जप्त; चोपडा येथील पहाटेची घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 15:34 IST2020-12-19T15:34:00+5:302020-12-19T15:34:05+5:30

दोघांविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

Seven village pistols seized from two youths in Punjab; Morning incident at Chopda | पंजाबमधील दोन तरुणांकडून सात गावठी पिस्तूल जप्त; चोपडा येथील पहाटेची घटना 

पंजाबमधील दोन तरुणांकडून सात गावठी पिस्तूल जप्त; चोपडा येथील पहाटेची घटना 

जळगाव:  पंजाबमधील दोन तरुणांकडून सात गावठी पिस्तूल जप्त करण्यात  आल्याची घटना चोपडानजीक चुंचाळे येथील बसस्थानकासमोर शनिवार दि. १९ रोजी पहाटे  सहा वाजता घडली.  या पिस्तूलांची किंमत सव्वादोन लाख आहे. 

दीपक विजय वर्मा (३६, रा. लुधियाना) आणि बलजितसिंग शानबरसिंग सरदार (२०, रा. होशियारपूर) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  हे दोघे जण उमर्टी ता. चोपडा  येथून गावठी पिस्तूल घेवून चारचाकी वाहनाने परतत होते.  त्याचवेळी चुंचाळे गावाजवळ पहाटे त्यांचे वाहन पोलिसांनी अडवून तपासणी केली. त्यावेळी  चक्क सात गावठी पिस्तूल आढळून आले.  या दोघांविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Seven village pistols seized from two youths in Punjab; Morning incident at Chopda

टॅग्स :Jalgaonजळगाव