अमळनेर तालुक्यात पाण्यासाठी सात योजनांचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:24 IST2018-02-24T23:24:41+5:302018-02-24T23:24:41+5:30
पर्जन्यछायेतील तालुका होणार हिरवागार, दुसºयाच्या वाटेला जातेयं पाणी

अमळनेर तालुक्यात पाण्यासाठी सात योजनांचा पर्याय
चुडामण बोरसे / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - अमळनेर तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तापी नदीचे वाहून जाणारे पावसाचे पाणी प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये उपसा सिंचनाद्वारे टाकून सर्व नदी-नाले पावसाच्या पाण्याने रिचार्ज करावेत, यासाठी वेगवेगळ्या सात योजनांचा पर्याय सादर करण्यात आला आहे.
या योजना पूर्ण झाल्यास पर्जन्यछायेत असलेला हा तालुका नक्कीच हिरवागार होण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे. तापी नदीवरून नियोजित उपसा सिंचनाच्या योजना खालीलप्रमाणे आहेत. योजनेचे नाव आणि त्याचा लाभ मिळणाºया गावांची नावे अशी आहेत-
कळणी नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- राजवड, लोणे, भोणे, शामखेडे, कंडारी खुर्द, कंडारी बु.।।, सोनखेडी, पातोंडा, खेडी खवशी, अमळगाव व परिसर). चिखली नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- खेडी, राजवड, सारबेटे खुर्द व सारबेटे बुद्रूक, चांदणी, कुºहे, नगाव, गडखांब, धुपे, गांधली, पिळोदे, माजडी, अमळगाव व परिसर). बोरी नदी नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- महाळपूर, बहादरपूर, भिलाली, अंबापिंप्री, कोळपिंप्री, फापोरे, कन्हेरे, बिलखेड, हिंगणे, बहादरवाडी, अमळनेर व परिसर). दुरन्या नाला उपसा सिंचन योजना (लाभ मिळणारी गावे- शिरुड, हिंगणे, फापोरे, लोंढवे, अमळनेर, धार, मारवड व परिसर). इंदापिंप्री व कावपिंप्री नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- इंदापिंप्री, कावपिंप्री, शिरुड, फापोरे व परिसर). मालण नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- जानवे, डांगर, रणाईचे, बोरखेडा, गोवर्धन, मारवड, धार, मालपूर व परिसर). लवकी नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- जवखेडे, एकलहरे, मुडी बु.।।, बावड व परिसर).
या योजनांच्या तांत्रिक माहितीसाठी चर्चा करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून चांदणी-कुºहे (ता. अमळनेर) येथे रविवार, २५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक होत आहे.
अमळनेर तालुक्यात एक वर्ष पाऊस, तर दुसºया वर्षी काहीच नाही अशी स्थिती असते. आमच्या वाट्याचे पाणी दुसरीकडे वापरले जात आहे.
-सुनंदा दिनकर पाटील, रिचार्ज योजनेच्या प्रवर्तक, शिरुड, ता.अमळनेर