सेट परीक्षा पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:43 IST2020-05-27T11:42:44+5:302020-05-27T11:43:17+5:30
जळगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र व गोवा राज्याकरिता राज्य चाचणी (सेट ) परीक्षा २८ जून रोजी आयोजित ...

सेट परीक्षा पुढे ढकलली
जळगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र व गोवा राज्याकरिता राज्य चाचणी (सेट ) परीक्षा २८ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोना परिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सदस्य सचिव यांनी ही माहिती दिली असून सदर परीक्षेची नवीन तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही . याबाबत वेळोवेळी महत्वपूर्ण सचूना संकेतस्थळावर कळविली जाणार आहे़ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी कुलसचिव तथा सेट समन्वयक प्रा. बी व्ही.पवार यांनी केले आहे.