ध्येय निश्चित करा, स्वत:मधील कौशल्य ओळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:32 IST2019-06-17T13:31:40+5:302019-06-17T13:32:43+5:30
नशिराबाद : दहावी - बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा सूर

ध्येय निश्चित करा, स्वत:मधील कौशल्य ओळखा
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : विद्यार्थ्यांनी मनाला जे आवडेल तेच करिअर निवडावे. दुसऱ्यांच्या सल्ल्याने करियर निवडून नका. शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने, आधी ध्येय निश्चित करावे आणि त्यात आपले स्व: कौशल्य ओळखावे. असे आवाहन नशिराबाद येथे झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात मान्यवरांनी केले.
येथील प्रभूचरण व्यायाम शाळेतर्फे दहावी - बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी भुसावळचे उप विभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड उपस्थित होते. तर व्यासपीठावर उद्योजक प्रकाश चौबे, दीपस्तंभचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, सरपंच विकास पाटील, उपसरपंच कीर्तीकांत चौबे , ग्रामपंचायत सदस्या सरला महाजन, सपोनि आर. बी. रसेडे उपस्थित होते.
यानंतर यजुर्वेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शंन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी मनाला जे आवडेल, तेच करून योग्य करिअर निवडावे, दुसऱ्यांच्या सल्ला घेऊन स्वत:चं करिअर निवडू नका. तसेच गावात अभ्यासिका व ग्रंथालयासाठी मदत करणार असल्याचेही सांगितले. गजानन राठोड यांनी सांगितले की, करियर निवडताना गोंधळून जाऊ नका, मेहनत करा, जिद्द बाळगा, तरच यश मिळेल. प्रकाश चौबे यांनी, शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन,स्किल इंडियाच्या माध्यमातून स्वत:चा विकास करण्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी गावात राबवित असलेल्या उपक्रमाला मदत देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
माजी सरपंच पंकज महाजन, विनोद रंधे, सय्यद बरकतअली, सय्यद नजीरअली, जनार्दन माळी, पी. पी. राणे, सचिन महाजन ,अरुण भोई, विनायक धर्माधिकारी, मुकुंदा रोटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व पालक वर्ग उपस्थित होते . सूत्रसंचालन बी. आर.खंडारे यांनी केले. तर एस. एस. कोळी यांनी आभार मानले. प्रभूचरण व्यायाम शाळेचे प्रमुख कीर्तीकांत चौबे, सुनील साळी, जयेश कुमट, दीपक जावळे, उमेश झटके ,संतोष कोळी, आदींनी परिश्रम घेतले.
या विद्यार्थ्यांचा झाला सत्कार
रिया चौधरी, मेघा आगरकर, गायत्री पाचपांडे, अंजुम गुलाब तडवी, वैष्णवी रंधे ,लोकेश न्हावी, रिता सावळे, दिपाली इंगळे संगीता भराडी वैशाली भोई, सपना कुंभार, शेख अस्वाद खान, मुस्कानबी ,खान असैया सय्यद, सृष्टी दीक्षित, स्वरांगी श्रावगी, अंकित पाटील, निखील माळी, सिद्धी अली, मयूर गायकवाड या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.