मालकाकडे ५० लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला नवजीवन एक्सप्रेमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 21:02 IST2021-05-21T21:01:37+5:302021-05-21T21:02:02+5:30
मालकाकडे नोकराने मित्राच्या मदतीने मालकाकडे ५० लाख रुपयांची चोरी केली. चोरलेली रक्कम घेवून ते राजस्थानमध्ये फरार होत असतांनाच त्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी भादलीजवळ नवजीवन एक्सप्रेसमधून अटक केली.

मालकाकडे ५० लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला नवजीवन एक्सप्रेमधून अटक
जळगाव : मालकाकडे नोकराने मित्राच्या मदतीने मालकाकडे ५० लाख रुपयांची चोरी केली. चोरलेली रक्कम घेवून ते राजस्थानमध्ये फरार होत असतांनाच त्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी भादलीजवळ नवजीवन एक्सप्रेसमधून अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली ३८ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
मंगलराम आसूराम बिस्नोई (१९,रा. खडाली ता. गुडामालाणी जि. वाडनोर राजस्थान) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन मित्राला सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.