ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांना नाट्यसेवा पुरस्कार घोषित

By विलास.बारी | Updated: August 5, 2023 23:32 IST2023-08-05T23:32:24+5:302023-08-05T23:32:58+5:30

२५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Senior theater actor Shambhu Patil was announced with theater service award | ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांना नाट्यसेवा पुरस्कार घोषित

ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांना नाट्यसेवा पुरस्कार घोषित

जळगाव : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य व नाट्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे. यात पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार जळगाव येथील लेखक व रंगकर्मी शंभू पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.

२५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे व निमंत्रक प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर यांनी माहिती पत्रपरिषदेत दिली. ३० ऑगस्ट रोजी मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होईल. खान्देशातील रंगभूमीला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे.
 

Web Title: Senior theater actor Shambhu Patil was announced with theater service award

टॅग्स :Jalgaonजळगाव