विद्यापीठात मंगळवारपासून ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:07+5:302021-08-13T04:21:07+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत कार्य ...

विद्यापीठात मंगळवारपासून ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षण शिबिर
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत कार्य करण्यासाठी १७ ते २१ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा उदघाटन समारंभ मंगळवारी सिनेट सभागृहात प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली होत असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन होणार आहे.
या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात प्रा.व्ही.व्ही.निफाडकर (धुळे), फेस्कॉम जळगावचे अध्यक्ष डी.टी.चौधरी, डॉ.विवेक काटदरे, हेमंत भिडे, डॅा. संदिप चौधरी (औरंगाबाद), डॉ.विजयश्री मुठे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना सांगळे, डॉ.राजेश करजगावकर(संचालक,पॅरामेडिकल सायन्सेस, जळगाव), आर.आय.पाटील (प्र.प्रमुख, योग मार्गदर्शनकेंद्र कबचौउमवि) आणि श्री. गिरीष कुळकर्णी (जळगाव) हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.