Selection of students from the SSBT campus campus | एसएसबीटीतील परिसर मुलखातील विद्यार्थ्यांची निवड
एसएसबीटीतील परिसर मुलखातील विद्यार्थ्यांची निवड

जळगाव- एसएसबीटी महाविद्यालयात नुकत्याच परिसर मुलाखती पार पडल्या़ यामध्ये महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे़
नेपचूनस पॉवर प्लँट सर्विसेस कंपनीचे अधिकारी शेख मुहिब आणि अनुश्री जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या़ मुलाखत प्रक्रिया दोन स्तरांवर पार पडली़ सुरुवातीला एच़आर राऊंड व नंतर वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली़ यात यंत्र अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी तेजस पाटील, निखिल पाटील, अनमोल कापडने व समीर खान यांची ट्रेनी सर्विस इंजिनीयर पदावर निवड झाली़ मुलाखत प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रदीप सोळंकी, सुशांत बाहेकर, अजय पुरी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, प्राचार्य डॉ. के. एस.वाणी व उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला़

 

Web Title:  Selection of students from the SSBT campus campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.