काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पासाठी जळगावच्या पूजा तिवारीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:31+5:302021-08-01T04:16:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पासाठी जळगावच्या आर्किटेक्ट पूजा तिवारी यांची ...

काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पासाठी जळगावच्या पूजा तिवारीची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पासाठी जळगावच्या आर्किटेक्ट पूजा तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे डिझाईन करणाऱ्या पथकात पूजा यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकतेच याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर सात मिनिटे सादरीकरण देखील केले.
पूजा तिवारी यांनी बी.ई. आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी वेरुळ येथील ज्योतिर्लिंगाबाबत सादर केलेल्या शोधप्रबंधाच्या आधारे ही निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या निवडीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी पूजा यांचा सत्कार केला. यावेळी त्यांचे वडील मनीष तिवारी, आई सुनीता तिवारी, खुशी तिवारी, आशुतोष तिवारी, गोपाल तिवारी, उषा तिवारी, विशाल तिवारी, चेतन तिवारी उपस्थित होते.
फोटो - पूजा तिवारी यांचा सत्कार करताना आमदार सुरेश भोळे. सोबत खुशी तिवारी, मनीष तिवारी, सुनीता तिवारी, विशाल तिवारी.